माळढोक आरक्षणा विरुद्ध विराट मोर्च्याने जनआंदोलन

कर्जतचे आमदार राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली भव्य मोर्च्रात तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.कर्जत तालुक्यातील हजारो एकरावर कर्जत तालुक्यात गेली अनेक वर्ष कधीही न दिसलेल्या माळढोक पक्षासाठी आरक्षण लागू केले असून या मुले तालूक्यातील हजारो शेतकरी कुटुंबे देशोधडीला लागणार आहेत. कर्जत तालुक्यातील ७३ गावातील १५३८३ हे. खाजगी शेत जमिनीवर हे आरक्षण लागू झाले असून याविरुद्ध आ. प्रा. राम शिंदे यांनी विविध पक्षांना एकत्र करत कर्जत तालुक्यात विविध गावामध्ये जनजागृती केली. तालुक्यातील भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआय, शेतकरी संघटना, व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन यांचे वतीने दि. १३ ऑगस्ट २०१२ रोजी कर्जत उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर शेतकर्याचा भव्य शेतकरी मोर्चा काढला. मोर्चास शेतकर्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सकाळी ९-०० वाजलेपासून येथील दादा पाटील महाविद्यालयासमोर गर्दी केली होती. दुपारी १२-०० वाजता हातात माळढोक हटाव शेतकरी बचाव, माळढोक आरक्षण रद्द करा, कर्जत तालुका दुष्काळी जाहीर करा, भारनियमन रद्द करा, कर्जत तालुक्यावरील अन्याय दूर करा असे विविध फलक घेतले होते. तर अशाच घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने कर्जतच्या मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला
मोर्च्याच्या अग्रभागी आ. राम शिंदे सह सर्व पक्षीय नेत्यांनी हि असेच फलक हाती घेऊन सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत आंदोलनकर्त्यानी जोरदार घोषणा बाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या ठिकाणी तयार केलेल्या मंचावरुन अनेक नेत्याची भाषणे झाली. या मध्ये भाजपचे युवा प्रदेशउपाध्यक्ष नामदेवराव राउत, तालुकाध्यक्ष कैलासराव शेवाळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, श्रीगोंद्याचे प. स. सदस्य राजेंद्र म्हस्के, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गुलाबराव तनपुरे, आरपीआय चे तालुकाध्यक्ष शरद भैलुमे, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे तालुकाध्यक्ष आशिष बोरा, शेतकरी संघटनेचे  लालासाहेब सुद्रिक, अल्लाउद्दिन काझी, अशोकराव खेडकर, कॉंग्रेसचे बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे विजयराव मोढले, शांतीलाल कोपनर, मनसेचे तालुकाध्यक्ष राहुल निम्बोरे, बापूराव चव्हाण, रघुनाथ काळदाते,  विक्रम शेळके, शिवाजी सुद्रिक, बप्पासाहेब देवकाते, आदीची जोरदार भाषणे झाली. तर मोर्च्या साठी आलेले खा. दिलीप गांधी यांनी यावेळी शेतकरी सर्व प्राणी मात्रावर प्रेम करत असतो गेली अनेक वर्ष येथील शेतकर्यांनी कधीही माल्धोकला विरोध केला नाही मग तरीही या शेतकर्यावर हे संकट का या प्रश्नासाठी आपण लोकसभेत आवाज उठवू असे सांगत या आमच्या काळ्या आईला हात लावल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा दिला. शेवटी आ. राम शिंदे यांनी माळढोक पक्षाचा इतिहास सांगून या माळढोक साठी कर्जत तालुक्यातील ६५ गावे पुनर्गठीत प्रस्तावात सादर केली असताना ती वाढून ७३ होतात तर श्रीगोंद्यातील मात्र ६८ गावे प्रस्तावित केली असताना ती कमी होऊन ४८ गावातच हे आरक्षण लागू होते असा अन्याय का? असा प्रश्न उपस्थित केला. हा लढा फक्त मोर्चा काढून थांबणारा नसून यात सातत्याने लढावे लागेल या साठी आपली सर्वाची तयारी हवी असे आवाहन केले. या शिवाय कुकडीच्या पाण्याचा अन्याय हि सहन करणार नाही, कर्जत तालुक्यातील फक्त ३ तलावात पाणी सोडले जाते तर श्रीगोंद्यात मात्र ४८ तलाव भरून घेतले जातात व त्यासाठी संपूर्ण तालुक्यात पाणी खेळवले जाते अशी जोरदार टीका करताना जसा अंबालिका कारखान्याची २०० एकर जमिन या आरक्षणातून वाचते, हिरडगावच्या कारखान्याची जमीन या आरक्षणात जात नाही तशीच कर्जत तालुक्यातील एकाही शेतकर्याची जमीन या आरक्षणात जाणार नाही यासाठी आपल्या लढा द्यावा लागेल असे आवाहन केले.
मोर्च्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप कोह्कडे यांना देण्यात आले व त्यांनी कुणाच्याही ७/१२ च्या उतार्यावर आरक्षणाची नोंद लागणार नाही अशी नोंद लावली असेल तर ती काढली जाईल व आपल्या तीव्र भावना वरिष्ठांना कळवू असे सांगितले. आंदोलकाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलिसांनी प्रांताधिकारी यांना पोलिसी गराड्यातच आणले व परत हि नेले. यावेळी मंचावर अमृत लिंगडे, भा. को. साळवे, प्रसाद ढोकरीकर,बी दि चव्हाण, युवराज राऊत ,अमृत काळदाते, संतोष काशीद, बिभीषण खोसे, अंगद रुपनर, अनिल गदादे, संजय भैलुमे, संजय तोरडमल, उमेश जेवरे, काका धांडे, एन डी मोरे, दत्तात्रय शिपकुले, रविंद्र सुपेकर, राजू धोत्रे, अनिल शर्मा, ज्ञानदेव काळे, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.